Saturday, May 5, 2012

सायको है साला!




काल बऱ्याच दिवसांनी कॉलेजात जाण्याचा योग आला.
मित्राला थोडं काम होतं,त्याच्यासोबत मीही जाऊन आलो.
बरेच बदल झाले होते,मात्र काही गोष्टी अजूनही जश्याच्या तश्याच होत्या.
त्या classrooms,त्या labs,ते CSE डीपार्टमेंट,ते लेक्चरर्स,तो नोटीसबोर्ड
फिरता फिरता आमच्या कॉम्पुटर सायन्स डीपार्टमेंट जवळ आलो.
आत काही जुने लेक्चरर्स बसले होते.
त्यातच आम्हाला अजिबात न आवडणारे 'ते' सर सुद्धा होते.


माझं मन पुन्हा भूतकाळात गेलं.
मित्राला विचारत होतो,
"काय बे,झालं का सबमिशन?"
"कुठून बे? तो साला xxxxx बसलाय ना,चू*** कुठला"
"का रे?"
"अबे एकच diagram १०-१० वेळा पुन्हा काढायला सांगतो.
मग नंतर काय तर index नीट नाही,फाईल चं कव्हर बरोबर नाही.
Total Bullshit Man!"
"जाऊ दे ना बे,दोन तीन महिनेच तर आहेत काढायचे आता.
मग कोण येतो इथे पुन्हा मरायला?"
सरांचा हा असला अनुभव प्रत्येकालाच आला होता.पण आम्ही दुर्लक्ष करत होतो.
मध्येच काही दिवस सर सुट्टीवर होते.
नंतर त्यांचे वडील वारल्याच कळलं.
काही दिवसांनी सर पुन्हा कॉलेजला यायला लागले.
आतापर्यंत practical exam जवळ आल्या होत्या.
आम्हाला वाटला,सरांमध्ये काहीतरी बदल होईल,पण पुन्हा पहिले पाढे पंचावन!
practicals सुरु असताना अक्ख्या क्लास समोर एखाद्याला उगाचच झापायचे,कोणाला फेल करण्याची धमकीच काय द्यायचे.
आम्ही सगळे वैतागून गेलो होतो.
पण internals त्यांच्याच हातात असल्याने कोणालाच काही बोलता येत नव्हतं.
शेवटी एकदाची परीक्षा संपली.यथावकाश निकाल लागून आम्ही (एकदाचे) Engineers झालो.marksheet हातात आल्यावर सर्वात आधी internals पाहिले.सर्वांनाच तसे बरे टाकले होते.



थोडक्यात सांगायचं झालं तर सरांनी फक्त धमकी दिली होती,पण खरी केली नव्हती.
पण तरीही राग सर्वांच्या मनात होताच,आणि त्याला कारण हि तसंच होतं.सरांनी चूक नसतानाही बर्याच लोकांचा सर्वांसमोर पाणउतारा केला होता.
शेवटी कुणीही त्यांच्याशी जास्त न बोलता कोलेज सोडलं.
वर्षभरात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं.
दरम्यान जे मित्र कॉलेजात होते,त्यांच्याशी contacts होतेच.त्यांनाही हेच सर होते.पुन्हा तेच प्रकार सुरु होते.
एक दिवस मित्राशी फोन वर बोलत होतो.तो आम्हाला जुनियर होता.
"क्या रे कैसा चल रहा है कोलेज?"
"सब ठीक है यार,सिर्फ वो xxxx बहोत परेशान कर राहा है"
"क्यो रे?"
"अबे क्या बताऊ,बेवाजाह साला चील्लाता है,बार बार submission करवाने लगाता है"
मला पुन्हा सगळं जुनं आठवलं
मी म्हणालो
"अबे जाने दे,तू ज्यादा ध्यान मत दे.सायको है वो"
"होंगा यार.तभी तो ऐसा करता है"
नंतर फारसं जास्त बोलणं झालं नाही.
अधूनमधून त्याच्यासोबत थोडफार बोलायचो,कॉलेजचा हालहवाल कळायचा.
सरांबद्दल हि कळायचं.पुन्हा राग यायचा,पुन्हा आम्ही जाऊ दे म्हणायचो.

आणखी काही दिवस गेले.
अचानक एकदिवस मुंबई हून एक Batchmate आला.त्याला कॉलेजमध्ये थोडं काम होतं.
बाकीचे बहुतेक मित्र एकतर जॉब किंवा बाहेर असल्याने शेवटी मीच त्याच्यासोबत कॉलेजात गेलो.
बरेच बदल झाले होते,मात्र काही गोष्टी अजूनही जश्याच्या तश्याच होत्या.
त्या classrooms,त्या labs,ते CSE डीपार्टमेंट,ते लेक्चरर्स,तो नोटीसबोर्ड
फिरता फिरता आमच्या CSE डीपार्टमेंट जवळ आलो.
आत काही जुने लेक्चरर्स बसले होते.
त्यातच आम्हाला अजिबात न आवडणारे 'ते' सर सुद्धा होते.
त्यांनी बघितल्या बरोबर आम्हाला ओळखलं.
आपणहून केबिनच्या बाहेर आले,आपुलकीने बोलले.
बोलत असताना मी त्याचं निरीक्षण करत होतो.
काहीतरी मला राहून राहून जाणवत होतं,पण नक्की काय ते 'क्लिक' होत नव्हतं.
शेवटी मग थोडावेळ सरांशी बोलून आम्ही निघालो.
" Be in touch. तुमच्यासारखे students येऊन भेटून गेले कि चांगलं वाटतं.",सर म्हणत होते.
मी विचार करत होतो,ह्यांचा नक्की कोणता चेहरा खरा मानायचा? Be in Touch म्हणणारा आत्ताचा कि आधी काहीही कारण नसताना उगाचच सर्वाना त्रास देणारा,सर्वांसमोर अपमान करणारा?
मान्य आहे कि विद्यार्थी चुकले तर त्यांना शिक्षा करण्याचा हक्क शिक्षकांना असतो.पण इथे तर चूक नसतानाही आम्ही शिक्षा भोगली होती.
एव्हाना आम्ही बिल्डींग च्या बाहेर आलो होतो.
मध्येच पुन्हा 'ते काहीतरी abnormal असल्याचं' जाणवायला लागलं.
मी मित्राला काही विचारणार इतक्यात तोच म्हणाला,
"yaar have you observed anything?"
म्हणजे याच्याही डोक्यात हाच किडा वळवळत होता तर.
"ya bro .His Eyes appeared abnormal"
"तुझे पता है generally ऐसा कब होता है?"
मग अचानक माझा ट्यूब पेटला.
"जितना मुझे पता है,ऐसा तो सिर्फ psychiatrist कि ट्रीटमेंट लेते है तब होता है"

आता माझ्या घराजवळ राहणाऱ्या एक काकांवर अशीच Treatment सुरु होती,त्यामुळे मला हि माहिती होती.
फक्त यावेळी ती क्लिक व्हायला वेळ लागला इतकंच.

"Exactly !"
"Means?You know something about it ?"
"हां! सर पर वोही treatment चालू है."

आता मात्र मी खरोखर surprised झालो होतो.
भलेही मी त्यांना बोलण्याचा नादात psycho वगैरे म्हणालो असेन पण हि बातमीच माझ्याकरता एक shock होती.
"उनके पिताजी जब expire हो गये,तब से उनको ये problem था."
"लेकीन तब अपने को तो कुछ भी पता नही था"
"अरे पहले ज्यादा नही था,बादमे बढ गया"

एका क्षणात माझ्या मनातला सगळा राग,सगळी चीड गळून पडली.सरांची दया यायला लागली.

मग मला स्वत:चीच लाज वाटायला लागली.
किती सोप्प असतं कोणालाही नाव ठेवणं.
कुणाला आपण जेव्हा psycho म्हणतो,तेव्हा आपल्याला जाणीव हि नसते कि कि ती व्यक्ती खरोखर तशी आहे का?
असेल तर का?
काय कारण असेल नक्की?

ती कारणं काहीही असोत,पण आता मात्र एक ठरवलंय,कि कोणालाहि काहीही म्हणायच्या आधी,एखादं 'लेबल' लावण्याआधी किमान दोनवेळा तरी विचार करायचा.
सरांच्या उदाहरणावरून हि एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली होती.