Wednesday, September 27, 2017



उस रात थंड बडी ही अलग थी।
सुखे पत्तोंसी चादर ओढे, कांटो की तरह चुभती जा रही थी।

हम तो निकले थे जश्न मनाने
दूर कही कुछ भुखे बच्चे बिलखते दिखाई दिये,
और एक सफर की मंजिल बदल गयी।

हम तो चले थे धरना देने,
रास्ते मे थोडी मलई क्या मिल गयी,
और एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

हम तो निकले थे डॉक्टर बन लोगोंकी सेवा करने,
रास्ते मे उन्हे डोनेशन देना पडा,
फिर क्या बताये,
एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

हम तो निकले थे इतिहास लिखने
रास्ते मे कुछ जातवाले क्या मिल गये,
एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

हम तो निकले थे भाई मिट्टी का तेल लेने
रास्ते मे बिजली से मुलाकात हो गयी
और एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

आखीर मे हम ठानकर निकल पडे सुरज को ढुंढने,
उस थंडी, सुखी सी रात के सांवले से उजाले मे चांदसे मुलाकात क्या हो गयी;
फिरसे एकबार सारे सफर की मंजिल बदल गयी।
- Swapneel


Thursday, March 16, 2017

MBA, जॉब, पॅकेज आणि नंतर ....




अमित माझा PG पासुनचा मित्र. मुळचा मध्यप्रदेशचा पण शिक्षणासाठी पुण्यात आलेला.कलाकार माणुस.गमती, नकला करण्यात, मिमिक्री करण्यात एकदम तरबेज. आणि बोलणं असं की लगेच समोरच्याशी ट्युनिंग जमेल. अपेक्षेप्रमाणे भाऊनेसुद्धा मार्केटिंग स्पेशलायझेशन घेतलं.

MBA सुरु असतानाच इंदोरला एका स्टॉक मार्केट आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणुक करणाऱ्या कंपनीत ह्याचं सिलेक्शन झालं. सुरुवातीचं पॅकेज होतं, 4 LPA.

निकाल लागले आणि हा लगेच जॉईन झाला.
काम होतं फोन कॉल करून लोकांना ह्यांच्या कंपनीद्वारे स्टॉक मार्केट आणि इतर ठिकाणी इन्व्हेस्ट करायला प्रवृत्त करायचं. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आणायची. थोडंफार Wolf of wallstreet प्रमाणे.
अर्थातच सेल्सच्या शिरस्त्याप्रमाणे टारगेट पुर्ण नाही झालं तर अश्व देखील लागायचेच.

आणि बहुतेक सेल्स वर्कफोर्सचं महिन्याचं टारगेट काही पुर्ण व्हायचं नाही.भरपुर प्रेशर असायचं.

तर एकदा अश्याच विवंचनेत असताना आमच्या मित्राला त्याच्या वडलांच्या नुकत्याच निवृत्त झालेल्या एका मित्राबद्दल कळलं. काकांना रिटायर झाल्यावर बरीच मोठी रक्कम मिळाली होती.

ह्याने त्या काकांना मोठ्या प्रयासाने आपल्या कंपनीद्वारे इन्व्हेस्ट करायला तयार केलं.
काकांनीही आपल्याच परिचयातला मुलगा आहे, चांगला शिकला आहे, MBA आहे म्हणजे चुकीचा सल्ला देणार नाही असा विचार करून बरेच पैसे गुंतवले. टारगेट पूर्ण झाल्यामुळे आणि बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे ह्याच्या डोक्यावर लटकणारी तलवार देखील दूर झाली.

मग नंतर काही दिवसांनी अचानक त्या काकांचा ह्याच्या वडलांना फोन आला. खुप काही बोलले.वडिलांनी सगळं ऐकुन घेतलं.
काकांना बराच लॉस झाला होता.

हे कळल्यावर मग ह्याने ऑफिसमधुनच काकांना कॉल केला. तीन चार वेळा काकांनी कट केल्यावर नाद सोडून दिला.

मग संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क साधुन स्टडी केला तर काकांना चुकीचे सल्ले देण्यात आले होते आणि भरपुर कमिशन उकळण्यात आलं होतं.
आणि बदल्यात काय, तर पुन्हा लॉस.

आणि सगळ्यात वाईट कशाचं वाटत असेल तर हे सल्ले देणाऱ्यांना हे सगळं माहीत होतं, तरीही कमिशन मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू होता.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर हा त्या काकांकडे गेला. काकु आजारी होत्या आणि मुलबाळ नसल्याने काकाच जवळपास सगळं बघायचे. ह्याला बघताच त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, "साहब, आपने तो बहुत ही अच्छा फल दिया हमारे भरोसे का।" आणि इतकं म्हणुन ह्याच्या तोंडावर दार बंद केलं.

मित्राने दुसऱ्याच दिवशी सकाळी उठून पेपर्स टाकले.

अमित आता स्वतःची ऍड एजन्सी चालवतो. पैसे पूर्वीपेक्षा थोडे कमी मिळतात, पण समाधान आहे .

Sunday, July 10, 2016



शेवटी काय, सावरकर पूर्णपणे समजणं, अगदी इतक्या वर्षानंतरही कुणालाच शक्य झालेलं नाही.
मग ते हिंदुत्ववादी असोत, विज्ञानवादी असोत,आस्तिक असोत,नास्तिक असोत, अंधभक्त असोत वा अंधविरोधक असोत.
कुणाला त्यांनी काळ्या पाण्यात चालवलेल्या कोलूमागच्या यातना नि कष्ट कळले नाहीत,कुणाला मंदिरं सर्वांसाठी खुली करण्यामागची भूमिका कळली नाही,कुणाला भाषाशुद्धी कळली नाही,कुणाला भारतीयांना सैन्यात भरती होण्याची आवाहने करण्यामागची कारणं कळली नाहीत तर कुणाला त्यांचे घरादारावर ठेवलेले तुळशीपत्र, देशासाठी मोडलेला संसार हे कळलं नाही.
माझ्यासारख्याला सावरकर एक त्यांच्या एक शतांश जरी कळले तरी भरपूर झालं.
पॉजिटिव्ह राहण्यामागची एक प्रेरणा वीर सावरकरदेखील आहेत हे सांगताना आजही अभिमान वाटतो. आणि का नाही वाटावा?
तब्बल 50 वर्षांसाठी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेल्यावर जो माणुस ब्रिटिश सरकारला "तुमचे साम्राज्य तरी तितके दिवस टिकेल का?" असं विचारतो, अंदमानातल्या त्या अंधारलेल्या सेल्युलर जेलमध्ये सगळीकडे फक्त निराशाच दिसत असताना "एक दिवस ह्याच तुरुंगात तुमचे पुतळे उभारले जातील" असा पोलादी विश्वास देणाऱ्या त्या महामानवापासून शिकण्यासारखी सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे हिम्मत आणि दुर्दम्य असा आशावाद!

-Swapneel




भाईकाका, (हो, अगदी हक्काने म्हणतोय कारण तुम्ही आमच्या मनात जे स्थान मिळवलेलं आहे त्यावरून तुम्ही दुसरे कोणी वाटतच नाही त्याला मी तरी काय करणार?) आजच्या दिवशी तुम्ही हे मर्त्य जग सोडून गेलात पण तरीही वाचणाऱ्या प्रत्येक मराठी घरात, तुम्ही ज्यांना आपलं मानलंत आणि ज्यांनी तुम्हाला आपलं मानलं त्या सर्वांच्या मनात आपला एक अंश कायमचा ठेवुन गेलात.
आयुष्य सहज सोपं करून सांगणाऱ्या, हसत हसत दु:ख विसरायला लावणाऱ्या ह्या मोठ्ठ्या माणसाला आपण साधी सामान्य माणसं देऊ तरी काय शकणार?
बाकी मोठंसं कधी होईल ते होईल, पण तुमची आठवण म्हणुन आम्हाला रोज निदान एका चेहऱ्यावर जरी हसू फुलवता आलं तरी खुप काही कमावलं असं वाटेल.
शेवटी काय, तुम्हीच सांगुन गेलात,
" ज्या दिवशी जन्माला येणं जस्टीफायबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टीफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.
जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोन होतं नाहीतर शुद्ध माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुद्धा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करत नाही.
आणि ज्यांना तो अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात."

(फोटो आंतरजालावरून साभार)

Friday, January 16, 2015

पण पुढे काय?


सहजंच एक विचार आला आज मनात - मी मेलो आज तर काय होईल?
खरंतर हा 'तर' खरोखर अनावश्यक. 'मेलो तर' नाही, एक ना एक दिवस 'मरायचंच' आहे. त्यातुन सुटका नाही.

मग नक्की कशाबद्दल गुढ, कुतुहल, भिती वाटते?

मरण्याबद्दल की 'आज' नाहीतर 'उद्या' मरण्याबद्दल?


कुठेसं वाचलं होतं की मरणाला माणुस भितो, कारण मरणाला 'उद्या' नसतो.

तसं पहायला गेलं तर ह्याआधीही दोनवेळा झालीच आहे की भेट त्याच्यासोबत. लहाणपणी एकदा पाण्यात बुडुन कसाबसा वाचल्यावर आणि आत्ता काही वर्षांपुर्वी उलटलेल्या कार मध्येे,
वेड्यावाकड्या पलट्या घेताना झालेली काही सेकंदांची, धावती पण नेहमीकरता लक्षात राहणारी त्याची भेट....


असो. मुळ प्रश्नाकडे परत येताना - खरंच काय होईल मी मेलो आज तर?
आजुबाजुचे रडतील, खासकरुन जवळचे नातेवाईक. मग होत जाईल सर्वांना सवय हळुहळु. नाही म्हणायला फॅमिलीला होईल जास्त त्रास पण काळ सगळ्यावर औषध आहे म्हणतात. फेसबुकवरच्या Rest in Peace किंवा इन शॉर्ट RIP च्या काही दहाबारा पोस्ट्स, काही जुन्या आठवणी, चांगला, होतकरु फोटोग्राफर वगैरै स्तुतीसुमनं, काही खरी आणि बरीचशी केवळ बोलायचं म्हणुन..


पण पुढे काय? असे कोणते तीर मारलेत आपण की कोणी आपली रोज नव्हे, पण कमीतकमी ५-६ महिन्यांत एकदातरी आठवण काढावी? असं काही केलंय का आपण जे आपल्यानंतर किमान काही वर्ष तरी टिकेल? ज्यामुळे कोणाचं तरी जिवन जास्त आनंदी होईल?

मुळात आपलं नाव कोणीतरी घ्यावं ही अपेक्षा तरी का म्हणुन ठेवावी?


आणि हा सगळा विचार सुरु उद्याचा. आजचं काय?

हातात असलेला क्षण माझा, त्याचं सोन करणं माझ्या हातात.
बाकी उद्याच्या, परवाच्या, मरणाच्या गोष्टी गेल्या तेल लावत..!




Monday, April 28, 2014

रात्रीची काॅफी @मरीन ड्राइव्ह

मरीन ड्राइव्ह - रात्रचे अडीच वाजलेले. आम्ही मित्र समुद्राचा खारा वारा अंगावर घेत बसलेलो.

सायकलची घंटी वाजली आणि पाठोपाठ आवाज आला " काॅफी ऽऽऽ "
"दे दो भैया एक"

ही रात्रीच्या वेळची काॅफी वेगळीच. ती मजा बाकी वेळच्या काॅफीत नाही.आणि तीसुध्दा मरीन ड्राइव्ह वर.
मी त्याच्याकडुन काॅफी घेतली.

अचानक मांझं लक्ष त्याच्या दुसर्या हाताकडे गेलं. शर्टच्या बाहीची गाठ मारलेली होती.
मंदीराबाहेर, सिग्नलवर कितीतरी धडधाकट लोक भीक मागताना मी पाहीले होते.

आणि इकडे हा माणुस एक हात नसताना,
दुसर्या हाताने सायकल, काॅफी आणि चहाच्या त्या किटल्या सांभाळत रात्रभर मरीन ड्राइव्ह वर फेर्या मारत चहा आणि काॅफी विकतो.

रात्रभरात कितीसे कप विकल्या जात असतील?
१० रुपयांत किती मार्जिन मिळत असेल?
त्याच्या घरी कोण कोण असतील?
कमावणारं आणखी कोणी असेल का?

प्रश्नावर प्रश्न येत होते.

मी विचार करत होतो.
आणि तो माझ्या मित्राने दिलेले पैसे घेऊन, सायकल पकडुन पुढे निघुन गेला होता.

साली त्या रात्रीची काॅफी जबरदस्तच होती.
स्वाभिमान, Self Respect, Self Esteem ज्या गोष्टी आम्ही फक्त बोलत, ऐकत किंवा वाचत आलो होतो ते सर्व त्या काॅफीत मिसळलेलं होतं.

Wednesday, January 15, 2014

Padmashri Namdeo Dhasal


Rest in Peace PadmaShri Namdeo Dhasal. 'Poet of the Underworld' who expressed the pains and deaths of the declined people through his poems. But most importantly, he made the world realized what their life is..

Away from the big flats and lavish societies there are people who live in slums and red light areas where there's no guarantee of employment, meal for one time or even life for the next morning. This man was one amongst them. Through his poems, he presented the realities of that side of life in a very harsh but touching way. In fact, one of the reasons that he was so effective was his direct language and the ability to create the exact picture in front of eyes of readers.
One may feel the language offensive, abusive but that's the harsh reality of life there. It can't be understood without experience. Those who seen or know how they pass each day, will only be able to understand his creatures and that too a limited extend.

So much to write but I think should stop here.

You'll be missed sir!

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत रहायचं का असंच
युद्धकैदी?

ती पहा रे ती पहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय.