शेवटी काय, सावरकर पूर्णपणे समजणं, अगदी इतक्या वर्षानंतरही कुणालाच शक्य झालेलं नाही.
मग ते हिंदुत्ववादी असोत, विज्ञानवादी असोत,आस्तिक असोत,नास्तिक असोत, अंधभक्त असोत वा अंधविरोधक असोत.
कुणाला त्यांनी काळ्या पाण्यात चालवलेल्या कोलूमागच्या यातना नि कष्ट कळले नाहीत,कुणाला मंदिरं सर्वांसाठी खुली करण्यामागची भूमिका कळली नाही,कुणाला भाषाशुद्धी कळली नाही,कुणाला भारतीयांना सैन्यात भरती होण्याची आवाहने करण्यामागची कारणं कळली नाहीत तर कुणाला त्यांचे घरादारावर ठेवलेले तुळशीपत्र, देशासाठी मोडलेला संसार हे कळलं नाही.
माझ्यासारख्याला सावरकर एक त्यांच्या एक शतांश जरी कळले तरी भरपूर झालं.
पॉजिटिव्ह राहण्यामागची एक प्रेरणा वीर सावरकरदेखील आहेत हे सांगताना आजही अभिमान वाटतो. आणि का नाही वाटावा?
तब्बल 50 वर्षांसाठी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेल्यावर जो माणुस ब्रिटिश सरकारला "तुमचे साम्राज्य तरी तितके दिवस टिकेल का?" असं विचारतो, अंदमानातल्या त्या अंधारलेल्या सेल्युलर जेलमध्ये सगळीकडे फक्त निराशाच दिसत असताना "एक दिवस ह्याच तुरुंगात तुमचे पुतळे उभारले जातील" असा पोलादी विश्वास देणाऱ्या त्या महामानवापासून शिकण्यासारखी सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे हिम्मत आणि दुर्दम्य असा आशावाद!
-Swapneel
