SPEL अर्थात SCMLD'S PROGRGRAM IN
EXECUTIVE LEADERSHIP चा Convocation
समारंभ सुरु होता. पास
झालेल्या आम्हां सर्वांना सर्टीफिकेट्स
मिळाली. आता पाळी Special Certificates
ची होती. खात्री नव्हती पण एखादं स्पेशल
सर्टिफिकेट आपल्याला पण मिळेल असं मनात
कुठेतरी वाटत होतं. आणि मी माझं नाव ऐकलं.
सर्वांनी हात मागे घेतले असताना पुढे येवुन
National Seminar आयोजित केल्याबद्दल हे
सर्टिफिकेट होतं.
जागेवर येवुन बसलो, समारंभ पुढे चालु झाला.
आता special commendation certificates
ची पाळी होती. आणि मी पुन्हा माझं नाव
ऐकलं. आधी विश्वास बसेना म्हणुन जाऊन
त्या अँकर पोरीला विचारलं नक्की माझंच
नाव आहे का म्हणुन! अस्मादिकांचं नाव
खरोखरंच यादीत होतं.
पुन्हा एकदा स्टेजवर गेलो. पाहुण्यांच्या हस्ते
सर्टिफिकेट घेउन आपल्या जागी येउन बसलो.
आता वैयक्तिक सर्टिफिकेट्स सुरु झाली.
मित्रांना सर्टिफिकेट्स मिळत होती, चांगल
वाटत होतं. आणि पुन्हा एकदा ....!
विश्वास बसत नव्हता पण यावेळी आमचे वर्गीस
सर स्वत: announcement करत होते.
देवाचे, आई-बाबा आणि वडीलधार्याचे
आशिर्वाद, सर्वांच्या शुभेच्छा याप्रकारे
फलद्रुप होताना दिसत होत्या.
आमचे पिल्लई सर म्हणाले होते , "काम करत
रहायचं, परिणामांचा विचार
नाही करायचा" आज तंतोतंत पटत होतं.
माझ्या करता ही सर्टिफिकेट्स फार
महत्वाची आहेत.
campus करता किंवा नाव होइल म्हणुन
नाही तर याआधी बरंचसं अपयश, टक्के टोणपे
खाल्लेत म्हणुन. प्रवास अजुन खुप मोठा आहे ,
बरंच कांहीं शिकायचं आहे ....
मी फार लहान आहे, पण हे वाचुन जर
कोणाला चांगल वाटलं,
कोणाला कांहीं करावसं वाटलं तर मला खरंच
आनंद होईल.
