Wednesday, September 27, 2017



उस रात थंड बडी ही अलग थी।
सुखे पत्तोंसी चादर ओढे, कांटो की तरह चुभती जा रही थी।

हम तो निकले थे जश्न मनाने
दूर कही कुछ भुखे बच्चे बिलखते दिखाई दिये,
और एक सफर की मंजिल बदल गयी।

हम तो चले थे धरना देने,
रास्ते मे थोडी मलई क्या मिल गयी,
और एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

हम तो निकले थे डॉक्टर बन लोगोंकी सेवा करने,
रास्ते मे उन्हे डोनेशन देना पडा,
फिर क्या बताये,
एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

हम तो निकले थे इतिहास लिखने
रास्ते मे कुछ जातवाले क्या मिल गये,
एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

हम तो निकले थे भाई मिट्टी का तेल लेने
रास्ते मे बिजली से मुलाकात हो गयी
और एक सफर की मंजिल फिरसे बदल गयी।

आखीर मे हम ठानकर निकल पडे सुरज को ढुंढने,
उस थंडी, सुखी सी रात के सांवले से उजाले मे चांदसे मुलाकात क्या हो गयी;
फिरसे एकबार सारे सफर की मंजिल बदल गयी।
- Swapneel


Thursday, March 16, 2017

MBA, जॉब, पॅकेज आणि नंतर ....




अमित माझा PG पासुनचा मित्र. मुळचा मध्यप्रदेशचा पण शिक्षणासाठी पुण्यात आलेला.कलाकार माणुस.गमती, नकला करण्यात, मिमिक्री करण्यात एकदम तरबेज. आणि बोलणं असं की लगेच समोरच्याशी ट्युनिंग जमेल. अपेक्षेप्रमाणे भाऊनेसुद्धा मार्केटिंग स्पेशलायझेशन घेतलं.

MBA सुरु असतानाच इंदोरला एका स्टॉक मार्केट आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणुक करणाऱ्या कंपनीत ह्याचं सिलेक्शन झालं. सुरुवातीचं पॅकेज होतं, 4 LPA.

निकाल लागले आणि हा लगेच जॉईन झाला.
काम होतं फोन कॉल करून लोकांना ह्यांच्या कंपनीद्वारे स्टॉक मार्केट आणि इतर ठिकाणी इन्व्हेस्ट करायला प्रवृत्त करायचं. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आणायची. थोडंफार Wolf of wallstreet प्रमाणे.
अर्थातच सेल्सच्या शिरस्त्याप्रमाणे टारगेट पुर्ण नाही झालं तर अश्व देखील लागायचेच.

आणि बहुतेक सेल्स वर्कफोर्सचं महिन्याचं टारगेट काही पुर्ण व्हायचं नाही.भरपुर प्रेशर असायचं.

तर एकदा अश्याच विवंचनेत असताना आमच्या मित्राला त्याच्या वडलांच्या नुकत्याच निवृत्त झालेल्या एका मित्राबद्दल कळलं. काकांना रिटायर झाल्यावर बरीच मोठी रक्कम मिळाली होती.

ह्याने त्या काकांना मोठ्या प्रयासाने आपल्या कंपनीद्वारे इन्व्हेस्ट करायला तयार केलं.
काकांनीही आपल्याच परिचयातला मुलगा आहे, चांगला शिकला आहे, MBA आहे म्हणजे चुकीचा सल्ला देणार नाही असा विचार करून बरेच पैसे गुंतवले. टारगेट पूर्ण झाल्यामुळे आणि बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे ह्याच्या डोक्यावर लटकणारी तलवार देखील दूर झाली.

मग नंतर काही दिवसांनी अचानक त्या काकांचा ह्याच्या वडलांना फोन आला. खुप काही बोलले.वडिलांनी सगळं ऐकुन घेतलं.
काकांना बराच लॉस झाला होता.

हे कळल्यावर मग ह्याने ऑफिसमधुनच काकांना कॉल केला. तीन चार वेळा काकांनी कट केल्यावर नाद सोडून दिला.

मग संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क साधुन स्टडी केला तर काकांना चुकीचे सल्ले देण्यात आले होते आणि भरपुर कमिशन उकळण्यात आलं होतं.
आणि बदल्यात काय, तर पुन्हा लॉस.

आणि सगळ्यात वाईट कशाचं वाटत असेल तर हे सल्ले देणाऱ्यांना हे सगळं माहीत होतं, तरीही कमिशन मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू होता.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर हा त्या काकांकडे गेला. काकु आजारी होत्या आणि मुलबाळ नसल्याने काकाच जवळपास सगळं बघायचे. ह्याला बघताच त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, "साहब, आपने तो बहुत ही अच्छा फल दिया हमारे भरोसे का।" आणि इतकं म्हणुन ह्याच्या तोंडावर दार बंद केलं.

मित्राने दुसऱ्याच दिवशी सकाळी उठून पेपर्स टाकले.

अमित आता स्वतःची ऍड एजन्सी चालवतो. पैसे पूर्वीपेक्षा थोडे कमी मिळतात, पण समाधान आहे .