मरीन ड्राइव्ह - रात्रचे अडीच वाजलेले. आम्ही मित्र समुद्राचा खारा वारा अंगावर घेत बसलेलो.
सायकलची घंटी वाजली आणि पाठोपाठ आवाज आला " काॅफी ऽऽऽ "
"दे दो भैया एक"
ही रात्रीच्या वेळची काॅफी वेगळीच. ती मजा बाकी वेळच्या काॅफीत नाही.आणि तीसुध्दा मरीन ड्राइव्ह वर.
मी त्याच्याकडुन काॅफी घेतली.
अचानक मांझं लक्ष त्याच्या दुसर्या हाताकडे गेलं. शर्टच्या बाहीची गाठ मारलेली होती.
मंदीराबाहेर, सिग्नलवर कितीतरी धडधाकट लोक भीक मागताना मी पाहीले होते.
आणि इकडे हा माणुस एक हात नसताना,
दुसर्या हाताने सायकल, काॅफी आणि चहाच्या त्या किटल्या सांभाळत रात्रभर मरीन ड्राइव्ह वर फेर्या मारत चहा आणि काॅफी विकतो.
रात्रभरात कितीसे कप विकल्या जात असतील?
१० रुपयांत किती मार्जिन मिळत असेल?
त्याच्या घरी कोण कोण असतील?
कमावणारं आणखी कोणी असेल का?
प्रश्नावर प्रश्न येत होते.
मी विचार करत होतो.
आणि तो माझ्या मित्राने दिलेले पैसे घेऊन, सायकल पकडुन पुढे निघुन गेला होता.
साली त्या रात्रीची काॅफी जबरदस्तच होती.
स्वाभिमान, Self Respect, Self Esteem ज्या गोष्टी आम्ही फक्त बोलत, ऐकत किंवा वाचत आलो होतो ते सर्व त्या काॅफीत मिसळलेलं होतं.
Monday, April 28, 2014
रात्रीची काॅफी @मरीन ड्राइव्ह
Subscribe to:
Post Comments (Atom)
Khupch mast....
ReplyDeletegood one, chan hota
ReplyDeleteVery well
ReplyDeleteToo good!! :)
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete